टेलिव्हिजन विश्वातील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ११व्या पर्वाची रविवारी धुमधडाक्यात सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा जावई जुबैर खान हा सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. शोमध्ये स्वतःविषयी सांगताना जुबैर बराच भावूक झाला होता. दाऊदशी नाते असल्यामुळे त्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. तसेच, मुलांना त्याच्यापासून दूर करून त्याला मारहाण करण्यात आल्याचेही जुबैरने सांगितले.

वाचा : आमिरच्या ‘या’ मुलीचा बोल्ड दृश्य करण्यास नकार

दाऊदशी आपला कोणताही संपर्क नसल्याचे सांगत जुबैर म्हणाला की, त्याच्याशी नाते असल्याचा माझ्या करिअरवर बराच परिणाम झाला. ‘बिग बॉस’च्या माध्यमातून माझी प्रतिमा बदलण्याचा माझा मानस आहे. दाऊदशी माझे नाते असल्याचे कळताच २०११ पासून गुंतवणूकदार, वितरक आणि इतर काही व्यक्तींनी माझ्या चित्रपटांकडे पाठ करण्यास सुरुवात केली. जुबैर हा एक निर्माता आहे.

अनेक लोक त्याला घाबरायचे असेही तो म्हणाला. बिग बॉस शोद्वारे चित्रपटसृष्टीतील लोकांच्या मनात त्याच्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्याची तसेच समाजविरोधी घटकांशी लढण्याची इच्छा असल्याचे जुबैरचे म्हणणे आहे.

वाचा : आघाडीची अभिनेत्री साकारणार कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका

‘बिग बॉस ११’मध्ये सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक (कॉमन मॅन) अशा दोन टीम आहेत. यात शिवानी दुर्गा, ज्योती कुमारी, सपना चौधरी, जुबैर खान, हिना खान, शिल्पा शिंदे, बेनफाश शोनवाल्ला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी आणि प्रियांका शर्मा या स्पर्धकांचा समावेश आहे.