रिमा लागू ( Reema Lagoo ) यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी भडभडे दाम्पत्याच्या पोटी झाला. सुमारे चार दशकांचा चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रिमा यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले.

फोटो गॅलरी : सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते….

रिमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव नयन भडभडे. त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे यादेखील अभिनेत्री होत्या.  हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच रिमा यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून मिळाला होता. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रीमा ताईंनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीलाही सुरुवात झाली.

वाचा : रिमा ताई…. तुम्ही कायम स्मरणात राहाल

एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित होतं. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, ‘कलयुग’ या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. ‘रिहाई’सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा ‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’ मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला. ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण, पुरुष, बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘छापाकाटा’ अशी त्यांची बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. पण, त्यांचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांना मृण्मयी लागू ही मुलगी असून, तीसुद्धा अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.

वाचा : BLOG : रिमा गिरगावला कधीच विसरली नाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूरदर्शनवरील ‘खानदान’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘तू तू मै मै’, ‘दो और दोन पांच’ या मालिकांमुळे रिमा घराघरांत आणि मनामनांत पोहोचल्या. सासू-सुनेमधील भांडण दाखवणाऱ्या ‘तू तू मै मै’ या विनोदी मालिकेलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेत रिमा यांनी सासूची भूमिका साकारली होती. त्यांनी ‘श्रावणसरी’ या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कयामत से कयामत तक’, ‘कल हो ना हो’ यासारख्या चित्रपटांमधून शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांची ‘ग्लॅमरस आई’ म्हणून त्या सगळ्यांनाच आवडल्या. पण, ‘वास्तव’मधील रघुभाईची कणखर आईही त्यांनी तितक्याच ताकदीने साकारली होती. रिमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली.