‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘जुडवा २’ या चित्रपटांमुळे नावारुपास आलेली अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. त्यासोबतच ‘जुडवा २’ या चित्रपटाच्या यशाचाही ती मनमुराद आनंद घेत आहे. चित्रपटांप्रमाणेच तापसी तिच्या हटके स्टाईल स्टेटमेंट आणि सोशल मीडिया पोस्टसाठीही बरीच चर्चेत असते. पण, सोशल मीडियावर सक्रिय असणं सध्या मात्र तापसीला चांगलच शेकल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पिंजऱ्यातील काही पक्ष्यांचा फोटो पोस्ट केला होता. ‘चला… या पक्ष्याप्रमाणे इतरांवर प्रेम करायला शिकूया’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला होता. काही युजर्सनी तापसीचा हा फोटो लाइक केला, काहींनी हे पक्षी किती सुंदर आहेत अशा कमेंटही केल्या. पण, काहींनी मात्र कमेंटबॉक्समध्येच तापसीची शाळाच घेण्यास सुरुवात केली. अनेकांनी ते पक्षी पिंजऱ्यातून सोडून दे अशी मागणीही केली आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

पोस्ट केलेल्या फोटोत लव्ह बर्ड्स असून, त्यांना पिंजऱ्यात बंद करून कसल्या प्रेमाचा प्रचार करते आहेस, असा प्रश्न तिला विचारण्यात येतोय. इतकेच नव्हे तर स्त्रीवाद आणि स्वातंत्र्याविषयी आपली मतं ठामपणे मांडणारे हे सेलिब्रिटी पिंजऱ्यातील पक्ष्यांचे फोटो पोस्ट करत आहे हे किती वाईट आहे अशी कमेंट एका युजरने केली आहे. आकाशात झेप घेतल्यावर त्यांना फार आनंद होईल, असे म्हणत पक्ष्यांना मुक्त करण्याचा सल्ला काहींनी तापसीला दिला. तेव्हा आता तापसी या साऱ्यावर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader