बॉलिवूड सेलिब्रिटींकडे अनेक महागडे कार आणि बाईक पाहायला मिळतात. मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर प्लेट पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल. या नंबर प्लेट्सवरून सेलिब्रिटीसुद्धा अंकशास्त्र, ज्योतिष, लकी नंबर या गोष्टींवर विश्वास ठेवतात असे दिसेल. खरंतर आरटीओकडून गाड्यांना नंबर दिले जातात. मात्र जास्त रक्कम मोजून व्हिआयपी नंबरही मिळवले जातात. सुशिक्षित, यशस्वी असूनही गाड्यांच्या क्रमांकांबाबत काही सेलिब्रिटींना अंधविश्वास असल्याचे दिसून येते. जाणून घेऊयात कोण आहेत हे सेलिब्रिटी…
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानकडे अनेक महागड्या गाड्या आहेत आणि या गाड्यांच्या नंबर प्लेटवर ५५५ हाच क्रमांक पाहायला मिळतो. इतकंच नाही तर किंग खान त्याच्या स्टाफ मेंबर्सनाही हा क्रमांक समाविष्ट करण्यासाठी आग्रह करतो. त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधील काही कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोन क्रमांकामध्येही ५५५ असल्याचे म्हटले जाते. शाहरूखचा या क्रमांकावर अंधविश्वास नसून ५५५ क्रमांकाची त्याला आवड असल्याचे म्हटले जाते.
बिग बी कारच्या नंबर प्लेटची निवड करताना २ या क्रमाकांवर जास्त भर देतात. यामागचे कारण म्हणजे ११ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. या क्रमांकाची बेरीज केल्यास १+१, आपल्याला २ क्रमांक मिळेल. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांच्यासाठी २ हा क्रमांक विशेष आहे.
रणबीर कपूरचा आवडता क्रमांक ८ असल्याने त्याच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर हा क्रमांक दिसून येतो. यामागचे कारण म्हणजे रणबीरच्या आईचा वाढदिवस म्हणजेच नीतू कपूर यांचा वाढदिवस ८ जुलै रोजी असल्याने रणबीरचा ८ हा आवडता क्रमांक आहे.
वाचा : …म्हणून टायगरच्या आईने ५ सुरक्षारक्षकांची केली नेमणूक
संजय दत्तच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर ४५४५ हा नंबर पाहायला मिळतो. अंकशास्त्रानुसार ९ हा क्रमांक त्याच्यासाठी लकी असल्याने ४५४५ ची बेरीजसुद्धा ९ येते.
वाचा : मादाम तुसाँमध्ये खुलणार मधुबालाचं हास्य
रितेश देशमुखसाठी १ हा क्रमांक लकी असल्याचे दिसते. विशेष म्हणजे त्याच्या गाडीवर R 1 असा असे पाहायला मिळते. नावाची सुरुवात R ने होत असल्याने नंबर प्लेटवर R 1 असा क्रमांक पाहायला मिळतो.
अभिनेता शाहिद कपूरसाठी ७ हा क्रमांक लकी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्याच्या गाड्यांवर ७ क्रमांक आवर्जून पाहायला मिळतो. इतकंच काय तर त्याची पत्नी मीरा राजपूतची जन्मतारीख ७ सप्टेंबर आहे. ७ जुलै २०१५ रोजी शाहिद आणि मीरा विवाहबंधनात अडकले. यातही विशेष म्हणजे जुलै हा महिनाही सातवाच.