अगं तो फ्रिज लवकर बंद कर… टीव्ही किती वेळ सुरु आहे… विजेचे बिल किती येते माहितीये का? अशी काही वाक्य सर्वसामान्य घरांतून अगदी हमखास ऐकायला मिळतात. महिन्याच्या विजेच्या बिलाचा आकडा ठराविक रकमेच्या जरा जरी पुढे सरकला की गृहिणींना धक्का बसतो. ही झाली मध्यमवर्गीय घरातील कथा. पण, विचार करा नेहमीच स्टायलिश जीवन जगणाऱ्या सेलिब्रिटींच्या घराचे विजेचे बिल किती येत असेल.

मोठ्या बंगल्यात आणि अपार्टमेण्टमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांच्या किंमतीच कोटींच्या घरात असतात. आता घर मोठं म्हटल्यावर त्यात विजेचा वापरही अधिक असणार यात काहीच शंका नाही. ‘इंडिया टाइम्स’, ‘अमर उजाला’ यांसारख्या अन्य काही वेबसाइट्सनी बॉलिवूड सेलिब्रिटींना अंदाजे किती इलेक्ट्रिसिटी बिल येत असेल, याचा संभाव्य आकडा दिलाय.

PHOTO : पूनम पांडेचा ‘संस्कारी लूक’ पाहून नेटिझन्स अवाक्!

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान दर महिन्याला जवळपास ४३ लाख रुपये वीज बिलावर खर्च करतो. हा आकडा केवळ त्याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या बिलाचा आहे.

चित्रपटांसाठी कोटींच्या घरात मानधन घेणारा सलमान खान वांद्रे येथील अपार्टमेण्ट आणि ‘बिइंग ह्युमन’च्या मुख्य कार्यालासाठी वीज बिलावर जवळपास २९ लाख रुपये खर्च करतो.

आमिर खानच्या अपार्टमेण्टचे अंदाजे महिन्याला नऊ लाख रुपये तर ‘आमिर खान फिल्म्स’च्या ऑफिसचे १३ लाख रुपये वीज बिल येते.
जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे वीज बिल अंदाजे २२ लाख रुपये इतके येते.

PHOTO : करण जोहरने शेअर केला गोंडस रुही, यशचा फोटो

सैफ अली खान मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांतील बंगल्याकरिता अंदाजे ३० लाख रुपये बिल भरतो.

दीपिका पदुकोण महिन्याला १३ लाख रुपये वीज बिलावर खर्च करते.

कतरिना कैफ तिच्या केवळ मुंबईतील अपार्टमेण्टच्या वीज बिलासाठी १० लाख रुपये खर्च करते, अशी माहिती या वेबसाईटसनी दिलीये.