अभिनेता दीपक तिजोरी सध्या अडचणीत आला आहे. त्याच्याविरोधात त्याची पत्नी शिवानीने बोरिवलीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक छळाचा खटला दाखल केला आहे. दीपक गोरेगाव येथे त्याच्या पत्नीसोबत राहायचा. मात्र त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्यावादातून तिनं त्याच्यावर खटला दाखल केला आहे.

नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; दीपक तिजोरीच्या पत्नीचा आरोप

दीपकच्या फ्लॅटमध्ये शिवानीनं त्याला राहण्यासाठी केवळ एक खोली दिली होती. तसंच दीपकसाठी जेवण तयार करायची नाही तसेच त्याची खोली साफ करायची नाही, अशी तंबी तिने घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली होती. एवढ्यावरच शिवानी थांबली नाही तर तिनं काही दिवसांपूर्वी त्याला फ्लॅटमधूनही बाहेर काढलं होतं. फ्लॅटमधून दीपकला हाकलल्यानंतर तिनं घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. पण शिवानीनं पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला नसल्याचं दीपकच्या लक्षात आलं आणि पोटगीचा दावा फेटाळण्यासाठी त्यानं कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यानंतर आता शिवानीने कौटुंबिक छळाचा आरोप करत पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे दीपक तिजोरीच्या अडचणींत अजून वाढ झाली आहे असेच म्हणावे लागेल.

घरी शिवानी त्रास देत असल्यानं दीपक आपला बहुतांश वेळ पेईंग गेस्ट वा कोणत्याही मित्राच्या घरी घालवत असे. या मुद्दय़ावरून दीपक आणि शिवानी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. दीपकचे बाहेर अफेअर असल्याचा आरोप शिवानीने केला आहे.

https://www.instagram.com/p/BMiY4JHhOp5/