नेटफ्लिक्सची ‘हसमुख’ ही वेब सीरिज सध्या खूपच चर्चेत आहे. क्राईम आणि सस्पेंसने भरलेल्या या सीरिजमधून देशभरातील वकिलांचा अपमान करण्यात आला, असा आरोप केला जात होता. परिणामी या सीरिजवर बंदी घालावी अशी विनंती देखील केली गेली. परंतु ANIने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – या चित्रपट दिग्दर्शकाने केली आत्महत्या

सर्वाधिक वाचकपसंती – PM Care फंडातील निधीचं काय केलं?; अभिनेत्रीचा मोदी सरकारला सवाल

नेमकं प्रकरण काय आहे?

‘हसमुख’ या सीरिजमधून देशातील गुन्हेगारी विश्व उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यामध्ये काही प्रमाणात न्यायालयीन कामकाजात केला जाणारा भ्रष्टाचार देखील दाखवण्यात आला आहे. मात्र या कथानकावर काही जण नाराज आहेत. वकिली व्यवसायाला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय या सीरिजवर बंदी घालण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. परंतु न्यायाधीश संजीव सचदेवा यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.

हसमुख ही एक डार्क कॉमेडी असलेली वेब सीरिज आहे. यामध्ये अभिनेता विर दास, रणवीर शौरी, आणि मनोज पाहवा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. निखिल गोंसालवीस यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. १० भाग असलेली ही सीरिज १७ एप्रिलला प्रदर्शित झाली होती.