सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘ओ शेठ’ हे गाणे धुमाकूळ घालताना दिसत आहे. जिकडे पाहावे तिकडे सर्वांचे स्टेटस, रिल्स आणि इतर ठिकाणी ‘ओ शेठ’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’च्या टीमने ‘ओ शेठ’ या गाण्यावर व्हिडीओ करुन शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘देवमाणूस’ मालिकेत डिम्पलची भूमिका साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अस्मिता देशमुख, नेहा खान, किरण गायकवाड, पुष्पा चौधरी हे कालाकार ‘ओ शेठ’ गाण्यावर धम्माल करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
आणखी वाचा : अजित कुमार ते सरु आजी; ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकारांच्या मानधनाविषयी माहितेय का?
View this post on Instagram
Video: ‘ओ शेठ’ या गाण्याने सोशल मीडियावर केला आहे कल्ला…जाणून घ्या गाण्यामागची गोष्ट
‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव आहे ‘ती परत आलीये.’