बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने आज पहाटे गोंडस मुलीला जन्म दिला. ईशाला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचे आणि भरत तख्तानीचे हे पहिलेच बाळ आहे.

वाचा : तुमची हिंमत कशी झाली?, फरहान अख्तरने भाजप प्रवक्त्यांना धरले धारेवर

याच वर्षी एप्रिल महिन्यात ईषाने ती गरोदर असल्याची गोड बातमी सर्वांना दिली होती. तिच्या मुलीच्या जन्माने हेमा मालिनी दुसऱ्यांचा आजी झाल्या आहेत. त्यांची लहान मुलगी आहाना हिने दोन वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिलेला. आहाना आणि तिचा नवरा वैभव वोहरा यांना डॅरियन हा मुलगा आहे.

वाचा : लैंगिक अत्याचाराविरोधात महिलांचं मौन धक्कादायक: विद्या बालन

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ईशाने फेब्रुवारी २०१२ ला व्यावसायिक भरत तख्तानी याच्याशी साखरपुडा केला होता. त्यानंतर जून २०१२ ला ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतरही ईशाने काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, २०१५पासून ती रुपेरी पडद्यापासून दूर झाली. ‘किल देम यंग’ (२०१५) या बहुभाषिक चित्रपटात ती शेवटची झळकली.