बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आणि म्हणाली राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता. हा चित्रपट राज कुंद्रा एका अॅपवर प्रदर्शित करणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गहना करणार होती असे देखील तिने सांगितले. एवढंच नाही तर गहनाने शमिता व्यतिरिक्त कंगना रणौत, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राचं देखील नाव घेतलं आहे.

गहनाने ‘नवभार टाईम्स ऑनलाईन’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. “तुरूंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसला गेली होती. त्यावेळी कळले की बॉलीफेम नावाचं एक नवीन अॅप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या अॅपवर आम्ही रिअॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि साधारण चित्रपट दाखवण्याचा विचार करत होतो. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिसणार नव्हते. याच दरम्यान, आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली होती. त्यानंतर शमिता शेट्टी, सई ताम्हणकर एक-एक स्क्रिप्टसाठी आणि आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार केला. मला अटक होण्याच्या ३ ते ४ दिवस आधी मी त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा विचार करत होते. मी हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते,” असे गहना म्हणाली.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

शमिता शेट्टी आणि त्यांची कधी भेट झाली का याविषयी बोलताना गहना पुढे म्हणाली, “मी शमिताला कधी भेटले नाही. चित्रपटाची स्क्रिप्ट ही मी उमेश कामात यांना शमिताला देण्यासाठी सांगितले होते. ती किती पैसे घेणार आहे आणि तिच्या काय अटी असणार आहेत याच्याशी मला काही घेणदेण नव्हतं आणि मी या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टीत पडले नाही. शमिताने उमेश कामतशी यावर चर्चा केली होती आणि यासाठी तिने होकार दिला होता.”

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

गहाना वशिष्ठने कंगना रनौतबद्दल काही गोष्टींवर चर्चा केली आहे. “जर तिला बॉलिवूडमध्ये इतका त्रास होतो, तर तिने हे सोडून निघून जायला पाहिजे. जे लोक तिला मदत करतात त्यांनाच ती धोका देते. महेश भट्टने कंगनाला चित्रपटात ब्रेक दिला आणि आज तिचं त्यांच्या विषयी चुकीच्या गोष्टी बोलते. ती बऱ्याचवेळा घराणेशाहीवर बोलताना दिसते आणि तिने काय केलं.. स्वत: च्या बहिणीला मॅनेजर बनवलं.” तर पुढे पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा विषयी बोलताना ती म्हणाली, “जर खरोखर पॉर्नोग्राफीचे प्रकरण आहे तर ते त्या दोघांवर असले पाहिजे.”

 

Story img Loader