‘बरेली की बर्फी’नंतर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट ‘शुभ मंगल सावधान’ उद्या म्हणजेच १ सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात आयुषमान त्याची ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातील सहअभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आयुषमानने शारीरिक संबंध या विषयावर मोकळेपणाने त्याची मतं मांडली.

‘लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचं मी समर्थन करतो. आपल्या समाजात अजूनही अरेंज मॅरेजला प्रोत्साहन दिलं जातं. लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.’, असे आयुषमान म्हणाला.

वाचा : ..अन् राजकुमारचे नशीब बदलले!

लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराबद्दल सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं असतं असं आयुषमानचं म्हणणं आहे. ‘लग्नानंतर जर समस्या कळली तर मग ते जोडपं काय करणार?’ असा प्रश्नही त्याने यावेळी उपस्थित केला. ‘आमच्या चित्रपटातही मुख्य कलाकार एकमेकांवर प्रेम करतात, साथ देतात. मात्र, प्रत्येकाच्या बाबतीत असंच असेल हे आपण सांगू शकत नाही ,’ असंही तो पुढे म्हणाला.

https://www.instagram.com/p/BYGCX4Yj22K/

PHOTOS : सुशांत आणि सारा शूटिंगपूर्वी केदारनाथ मंदिरात नतमस्तक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुषमान आणि भूमीच्या ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलंय. चित्रपटाच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. आरएस प्रसन्न दिग्दर्शित हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.