माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित ‘इंदु सरकार’ सिनेमा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या सिनेमातून इंदिर गांधी आणि राजीव गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अनेक काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. यामुळेच मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदु सरकार’ या सिनेमाला अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागत आहे.
ग्रीन कार्पेटवर कलाकारांचा जलवा
पुण्यात या सिनेमाच्या टीमने एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलमध्येच मधुर भांडारकर विरोधात निदर्शन करायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे ही पत्रकार परिषदही रद्द करावी लागली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हॉटेलवर मोर्चा काढण्यात आला होता. हा सिनेमा प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे.
मधुरने याबाबत त्याच्या ट्विटरवरून प्रखर शब्दात नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात येत आहे. मी आणि माझी टीम हॉटेलच्या एका रुममध्ये बंधक असल्याप्रमाणे बसलो आहोत.’
Congress workers hv barged in the Hotel lobby & created ruckus,me & team are stranded like hostages in hotel room. #pune activity cancelled. pic.twitter.com/6GHX1VHGD8
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 15, 2017
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांना दाखवण्याची मागणी सेन्सॉर बोर्डाकडे केली होती. यासंदर्भात निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्रदेखील लिहिले होते. पण मधुर भांडारकर यांनी प्रदर्शनापूर्वी सिनेमा कोणालाही दाखवण्यास मनाई केली होती. तर दुसरीकडे अलाहाबादच्या एका काँग्रेस नेत्याने सिनेमाचा विरोध करत दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या चेहऱ्याला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली होती.
या सिनेमावेळी श्रीदेवी, रजनीकांतवर थुंकली होती
या सर्व प्रकरणावर बोलताना मधुर म्हणाले होते की, ‘आणीबाणीशी निगडीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्याबद्दल कोणी आक्षेप घेत नाही, पण मग माझ्या सिनेमावर का आक्षेप घेतला जातो?’ मधुर भंडारकर दिग्दर्शित या सिनेमात किर्ती कुल्हाडी, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाला अनेक कारणांमुळे विरोध होत आहे. येत्या २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.