ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या परिराणीच्या वाढदिवसानिमित्त बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. काल आराध्या बच्चन सहा वर्षांची झाली. या पार्टीला आराध्याचे आजोबा म्हणजेच बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन हेसुद्धा उपस्थित होते.

वाचा : कारचे चाक निखळल्यामुळे अपघात, अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले

आराध्याने गुलाबी रंगाचा प्रिन्सेस फ्रॉक घातलेला आणि त्याला साजेसा हेअरबॅण्ड लावला होता. निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ऐश्वर्याही खुलून दिसत होती. तर अमिताभ आणि अभिषेक यांनी जीन्स आणि झिपरला प्राधान्य दिले. ऐश्वर्याची आई वृंदा रायसुद्धा आपल्या नातीच्या वाढदिवसाला आल्या होत्या. मुंबईतील जेडब्ल्यू मॅरिएटमध्ये आराध्याच्या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक – ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न केले. आराध्याचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ साली झाला.

वाचा : … या बॉलिवूड अभिनेत्रीचे ‘मॅरेज प्रपोजल’ करण जोहरने धुडकावले होते!

अमिताभ यांनी सकाळीच आराध्याचा फोटो ट्विट करून नातीला शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोत आराध्याने ती लहान असताना काढलेल्या फोटोची फ्रेम हातात पकडल्याचे दिसते. तसेच, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी आभारही मानले. अभिषेकनेही संध्याकाळी आपल्या लाडक्या लेकीचा फोटो ट्विट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.