सध्या देशात सर्वाधिक चर्चा आहे ती IPLची. यंदाच्या पर्वात अंतिम फेरीचे दावेदार कोण ठरणार आणि कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच, क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. IPLचा २७ मे रोजी होणारा अंतिम सामना प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना मराठी समालोचनासह पाहता येणार आहे. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहे.

‘मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आता IPL च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्यानं त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मराठी माणसांना पहिल्यांदा क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी मिळणार आहे. मला खात्री आहे, क्रिकेट आणि मराठी भाषेच्या जल्लोषात प्रेक्षकही नक्की सहभागी होतील आणि आयपीएल आणखी एक पाऊल पुढे टाकेल,’ अशी भावना स्वप्नील जोशीनं व्यक्त केली.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO

Video : प्रत्येक ‘ब्राईड टू बी’साठी वीरे दी वेडिंगचं परफेक्ट गाणं

अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे, ज्यात माधुरी दीक्षित आणि स्वप्नील जोशी सहभागी होतील. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे. त्यामुळे मराठीतून अंतिम सामना पाहण्याची ही दुर्मिळ संधी चुकवू नका. IPL २०१८ चा अंतिम सामना पाहा २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून फक्त ‘स्टार प्रवाह’वर, कारण खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे.