आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे एक्स कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र आले आहेत. दोघेही १४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. ब्रेकअपनंतर दोघेही आता एकमेकांसोबत विनातक्रार काम करण्यासाठी तयार असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. चित्रपटाचं संगीत अनावरण झाल्यानंतर कतरिनाने रणबीर आणि दिग्दर्शक अनुराग बासूसोबतचा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला.

नुकताच कतरिनाने रणबीरसोबत डान्सचा सराव करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. अप्रतिम डान्स करतानाचा हा व्हिडिओ पाहताना दोघांमधील केमिस्ट्री पुन्हा एकदा आपल्यासमोर येते. याआधी कतरिनाच्या नृत्यशैलीबद्दल रणबीर म्हणाला, ‘कतरिना उत्तम डान्सर असल्याने तिच्यासोबत जुळवणं मला कधी कधी खूप कठीण जातं. ‘शीला की जवानी’, ‘चिकनी चमेली’, ‘माशाल्लाह’ आणि ‘कमली’सारख्या गाण्यांमधील कतरिनाच्या नृत्यकौशल्यामागे माझा खूप मोठा हात आहे. सरावासाठी मी नेहमी तिच्यामागे लागायचो आणि चेहऱ्यावरील हावभावसुद्धा मीच तिला शिकवले.’

PHOTOS : श्रीदेवीसोबतची ‘ती’ उंच मुलगी आहे तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जग्गा जासूस’मधील कतरिनाच्या अभिनयाबद्दल रणबीर म्हणाला, ‘चित्रपटात अतिशय उत्तम अशी कामगिरी तिने केलीय आणि आम्हाला त्याचा गर्व आहे.’ त्यामुळे बॉलिवूडमधील ही बहुचर्चित जोडी आता पडद्यावर काय कमाल दाखवते हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.