‘रॉकस्टार’ रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. अनुराग बासू दिग्दर्शित हा चित्रपट १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाची तारीख बऱ्याचदा बदलल्यानंतर सरतेशेवटी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे ही महत्त्वाची बाब असली तरीही सध्या ‘जग्गा जासूस’ गाजतोय तो म्हणजे रणबीर- कतरिनाच्या केमिस्ट्रीमुळे. गेल्या वर्षी बी- टाऊनच्या या बहुचर्चित कपलचा ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणातही बरेच अडथळे आले होते. त्यानंतर पुन्हा या दोन्ही कलाकारांनी चित्रीकरणावर रुजू होत चित्रपट पूर्णत्वास नेला.
रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिनाने सोशल मीडियावर पदार्पण केलं. फेसबुकमागोमाग इन्स्टाग्रामवरही तिने स्वत:चं अकाऊंट सुरु केलं.

मुख्य म्हणजे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या फॉलोअर्समध्ये अभिनेता रणबीर कपूरचाही समावेश आहे. रणबीर आणि सोशल मीडिया…तुम्हालाही धक्का बसला ना? सोशल मीडियावर सक्रिय नसणाऱ्या ‘सावरिया’ रणबीरने स्वत:च ही बाब सर्वांसमोर मांडली आहे. ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनदरम्यान रणबीरने याबाबतचा खुलासा केला. रेडिओ स्टेशनच्या एका कार्यक्रमात असताना रणबीर कॅटला उद्देशून म्हणाला, ‘मी इन्स्टाग्रामवर आहे. कतरिनाला फॉलो करणारा मी तिचा तिसरा फॉलोअर आहे. आणखी काय हवं… मी तिच्या अकाऊंटवर लक्ष ठेवून आहे. ती जेव्हा जेव्हा फोटो पोस्ट करते तेव्हा मी तिला फोन करुन तो फोटो पोस्ट करण्याचं कारण विचारतो, त्या फोटोचे अॅंगल आणि बरंच काही विचारतो.’

रणबीरच्या या वक्तव्यामुळे अनेकांचना धक्काच बसला आहे. सोशल मीडियावर रणबीरचं अकाऊंट नेमकं कोणत्या नावाने आहे हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एकिकडे रणबीरच्या अकाऊंटचा शोध सुरु असतानाच तो आणि कतरिना त्यांच्या आगामी जग्गा जासूस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या रणबीर आणि कतरिनाची केमिस्ट्रीसुद्धा अनेकांची मनं जिंकत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या नात्यामध्ये असलेली कटुता काही काळ दूर सारली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता रणबीर- कॅटची ब्रेकअपनंतरची केमिस्ट्री असणारा चित्रपट प्रेक्षकांनी मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर गाजतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/BVRVYMkA3ET/

रणबीरच्या या वक्तव्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. सोशल मीडियावर रणबीरचं अकाऊंट नेमकं कोणत्या नावाने आहे हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एकिकडे रणबीरच्या अकाऊंटचा शोध सुरु असतानाच तो आणि कतरिना त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या रणबीर आणि कतरिनाची केमिस्ट्रीसुद्धा अनेकांची मनं जिंकत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या नात्यामध्ये असलेली कटुता काही काळ दूर सारली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता रणबीर- कॅटची ब्रेकअपनंतरची केमिस्ट्री असणारा चित्रपट प्रेक्षकांनी मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर गाजतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Father’s Day 2017 : बाबाच सांगत आहेत ‘आर्ची’च्या धाडसाची कहाणी

Story img Loader