बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’च्या निमित्ताने अनेकांनी महिलांच्या मुलभुत हक्कांविषयी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. मासिक पाळी आलेल्या स्त्रिला मिळणारी वेगळी वागणूक आणि त्याकाळात महिलांनी घ्यावयाच्या स्वच्छतेविषयीची काळजी यावर उघडपणे बोलणे गरजेचे असल्याचे अक्षयने म्हटले होते. दरम्यान, सरकाराने महिलांची मुलभूत गरज असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेला जीसटी हा चुकीचा आहे असे मतही त्याने मांडले. मात्र, अभिनेत्री काजोलने याविषयावर बोलण्यापासून सावध भूमिका घेतल्याचे दिसते.

वाचा : इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ मोहिमेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेल्या काजोलला सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेल्या जीसटीविषयी सवाल करण्यात आला. त्यावर काजोल म्हणाली की, हा सर्वस्वी सरकारचा निर्णय आहे. काय योग्य आहे आणि काय व्हायला हवे, याची सरकारला अधिक माहिती आहे. सध्याच्या घडीला अनेक मोठ्या व्यक्ती सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. ही खूप चांगली बाब आहे. त्यामागचे कारण काहीही असो, अखेर यामुळे परिणाम सर्वाधिक महत्त्वाचा आहे. समजा मी एक सामान्य व्यक्ती असून, टीव्ही बघते आणि त्याचवेळी एखादा सेलिब्रिटी काहीतरी सांगत असेल तर मी थांबून त्यांचे बोलणे ऐकणारच.

वाचा : रघुराम राजन, सुनिल गावस्कर यांच्या शेजारी रणवीर-दीपिकाचा नवा बंगला?

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे नसल्याचा निर्णय दिला. यावरही काजोलने भाष्य केले. मला इतरांचे माहिती नाही. पण, माझ्या कानावर राष्ट्रगीत पडते तेव्हा मी आपणच उभी राहते, असे काजोल म्हणाली.