‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी तशी सर्वांनाच माहित आहे. नवीन पिढीही या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल उत्सुकतेने बातम्या वाचताना दिसते. काही नात्यांबद्दल चवीने बोलले जाते, अशा नात्यांमध्ये अमिताभ आणि रेखा यांचे नाव आवर्जुन घेतले जाऊ शकते. या दोघांनी कधीही एकमेकांच्या प्रेमात असण्याला दुजोरा दिला नाही. पण तरीही या दोघांबद्दल अनेक गोष्टी चर्चिल्या गेल्या. अमिताभ बच्चन यांचे स्वतःचे आनंदी कुटुंब आहे, तर दुसरीकडे रेखा मात्र आजही एकट्याच आहेत.

बाबा राम रहिम कोणत्याही चित्रपटाची कथा एका तासात लिहायचा

दोघांनी कधीही मान्य केले नसले तरी रेखाच्या मनात अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास जागा असल्याचे सिनेसृष्टीत म्हटले जाते. वेळेप्रसंगी त्या ‘बिग बी’ यांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत रेखा यांनी ‘बिग बी’ यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. अमिताभ यांच्या अंगी असे दोन गुण आहेत जे आजही रेखा यांना आवडतात.

‘मनाचा मोठेपणा’ आणि ‘नात्यांबद्दलची गंभीरता’ या त्यांच्या दोन गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करायच्या, असे रेखा यांनी मुलाखतीत म्हटले होते. एवढेच बोलून त्या थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या की, ‘मोठा माणूस तोच असतो जो स्वत:साठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगतो आणि अमिताभ यांपैकी एक आहेत. अमिताभ किती ही दु:खात असले तरी ते नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.’

कदाचित याच कारणामुळे अमिताभ यांनी कधी ही दुसरा विवाह केला नाही. कारण आपल्या आनंदासाठी त्यांना दुसऱ्यांना कधीच दुखवायचे नव्हते. रेखाशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन अमिताभ जेव्हा आपल्या वडिलांकडे गेले होते तेव्हा वडिलांनी त्यांना समजावून सांगितले. तुझ्या एका निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य कसे उद्धवस्त होईल याबद्दल जाणीव करुन दिली. अमिताभ बच्चन यांनी वडिलांचा प्रत्येक शब्द पाळला. या सगळ्या परिस्थितीमुळेच त्यांनी रेखासोबत असलेले नाते कायमस्वरुपी संपवण्याचा निर्णय घेतला. आजही जेव्हा बॉलिवूडमधल्या नात्यांची चर्चा होते तेव्हा सगळ्यात आधी ‘बिग बी’ आणि रेखा या जोडीचे नाव आवर्जून घेतले जाते.

वडील आदित्य आणि कंगनाच्या नात्यावर सूरज पांचोलीची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अमिताभ हे छोट्या पडद्यावर ‘कौन बनेंगा करोडपती’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय ते ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मध्ये आमीर खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.