हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक म्हणजे अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी. ‘लम्हे’, ‘जुदाई’, ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांमधून ही जोडी झळकली आणि अनेकांच्या फेव्हरेट लिस्टचा भाग होऊन गेली. पण, या साऱ्यामध्ये एका चित्रपटात मात्र अनिल कपूरने श्रीदेवीसोबत काम करण्यास नकार दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कपूरने नकार दिलेला तो चित्रपट म्हणजे, ‘चाँदनी’. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वप्रथम अनिल कपूर यांना विचारण्यात आलं होतं. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटातून विनोद खन्ना यांचीही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली होती. पण, हा चित्रपट नेमका अनिल कपूर यांनी का नाकारला याचा आता त्यांनीच खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण स्पष्ट केलं. व्हीलचेअरवर बसून अभिनय करण्यासाठी तयार नसल्याचं सांगत त्याने हा चित्रपट नाकारला होता. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याचा अपघात होतो, ज्यानंतर त्याची बरीच दृश्यं ही व्हीलचेअरवर दाखवण्यात आली होती. आपण कधीच स्वत:ला व्हीलचेअरवर बसल्याचं पाहू शकत नाही, असं म्हणत अनिलने हा चित्रपट नाकारला होता.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

‘चाँदनी’ नाकारण्यामागे आणखी एक कारण होतं ते म्हणजे अनिलचा अपघात. या चित्रपटासाठी विचारणा केल्यानंतर अनिलचा अपघात झाला होता. ज्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. ज्यानंतर बराच काळ त्याने विश्रांती घेतली. याच दरम्यान, आपल्या चित्रपटांची निवड करण्याच्या निकषांवरही त्याने पुनर्विचार केला होता. अनिल कपूर हा हिंदी चित्रपटसृष्टीत एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच तो ‘फन्ने खान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why bollywood actor anil kapoor refused rishi kapoors role in chandni
Show comments