ईडन गार्डन्सच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा ‘चायनामॅन’ कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. भारताकडून वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेणारा कुलदीप तिसरा भारतीय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताने सलग तीन सामन्यांमध्ये बाजी मारत मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेत हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांच्याव्यतिरीक्त कुलदीप हा महत्त्वाचा खेळाडू ठरतोय. दरम्यान, विजयी घोडदौड सुरु ठेवलेल्या विराट कोहलीच्या या संघाने वन-डेत अव्वल स्थान मिळवले. २०१९च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घडी बसत असतानाच आपल्याला कोणत्या अभिनेत्रीसोबत निर्जन बेटावर डेटवर जाण्यास आवडेल याचा खुलासा खुद्द कुलदीपनेच केलाय.

वाचा : 29 years of Ashi Hi Banwa Banwi ‘लिंबू कलरची साडी… २९ वर्ष झाली अजूनही रंग फिका पडला नाही’

ईडन गार्डन्सवरील हॅटट्रिकमुळे कुलदीप प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हापासूनच त्याच्या आयुष्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न चाहते करत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू यांचे फार जुने नाते आहे. टायगर पतौडी, युवराज सिंग, विराट कोहली, अझहर मेहमूद, हरभजन सिंग या क्रिकेटपटूंनी बॉलिवूआ अभिनेत्रींमध्ये आपले प्रेम शोधले. आता यांच्या यादीत बहुधा कुलदीपचेही नाव जोडले जाऊ शकते. यामागचे कारण त्याने दिलेल्या एका प्रश्नाचे उत्तर आहे. तू एखाद्या बेटावर अडकलास तर तुला कोणत्या अभिनेत्रीसोबत राहायला आवडेल, असा प्रश्न कुलदीपला एका शोमध्ये विचारण्यात आला होता. यावेळी त्याने क्षणातच जॅकलिन फर्नांडिसचे नाव घेतले. श्रीलंकन मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या जॅकलिनला हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार हे नक्कीच पाहण्याजोगे असेल.

वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीने गमावली आमिरसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी