बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने लवकरच तिच्या पहिल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मकरसंक्रांतीला त्याचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता नुकताच टीझर सर्वांसमोर आला आहे. माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे.

स्वत:च्या आयुष्यातील वेगळेपण शोधणाऱ्या एका सामान्य स्त्री बाबत हा चित्रपट आहे, हे टीझर पाहून सहज लक्षात येतं. मधुरा साने, असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. एक योग्य पत्नी, आई आणि गृहिणी, जी स्वत:ची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची… आपल्या सगळ्यांची,’ अशी या चित्रपटाची आकर्षक टॅगलाइन आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
Juna Furniture trailer
Video: स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बाबाची गोष्ट, ‘जुनं फर्निचर’चा विचार करायला भाग पाडणारा ट्रेलर प्रदर्शित

वाचा : रिक्षावाल्याच्या रुपात खिलाडी कुमारने ‘तिला’ दिला आश्चर्याचा धक्का

या चित्रपटात रेणुका शहाणेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र टीझरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळत नाही. टीझरमध्ये माधुरी सई या नावाचाही उल्लेख करते. मग ही सई म्हणजे रेणुका शहाणेच का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. या दोघी तब्बल २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. याआधी माधुरी आणि रेणुका यांनी ‘हम आपके है कौन’ सिनेमात बहिणींची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

https://www.instagram.com/p/Bd-NXJxHdMU/

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज् आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तेजस देओस्कर दिग्दर्शित हा चित्रपट तुमची, आमची सगळ्यांचीच बकेट लिस्ट भरायला लवकरच येणार आहे.