तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टरने गोड करणा-या माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटात नेमका कोणता कलाकार तिच्यासमोर पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. ज्याचं उत्तर नुकत्याच समोर आलेल्या फोटोमधून मिळालं आहे. होय! या कलाकाराचं नाव आहे, सुमित राघवन… हा हरहुन्नरी अभिनेता ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने ‘धकधक गर्ल’ माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

PHOTO : स्वप्नील जोशीच्या मुलाचा नामकरण सोहळा

या रोमॅण्टिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच ‘बकेट लिस्ट’ची टीम मलेशियातील लंकावी येथे जाऊन पोहोचली असून या गाण्याचे बोल ‘तू परी’ असे आहेत. बॉलिवूड गाजवणारी ही परी ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ चित्रपटातून आपल्या समोर अवतरणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.

वाचा : चित्रपटात सती प्रथेचे उदात्तीकरण

‘बकेट लिस्ट’ टीमच्या या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.