बॉलिवूड अभिनेता अरबाज खानचा आज ५० वा वाढदिवस. हा खास दिवस मलायका अरोराने अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. नुकताच मलायकाने अरबाजचा केक कापतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा अरबु पापा.’ यावरुन आपल्या मुलाच्यावतीने तिने हा केक मागवला होता असं दिसतंय. या फोटोसोबत तिने अजून एक व्हिडिओ शेअर केला.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी जोधपुर न्यायालयात हजर राहणार सलमान खान

या व्हिडिओमध्ये अरबाज केकऐवजी कलिंगड कापताना दिसतोय. हे कलिंगड कापताना त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या अनेकांचे आवाज ऐकू येत आहेत. या व्हिडिओवर एका युझरने ‘हॅप्पी वॉटरमेलन डे’ असा अनोखा संदेश दिला. तिच्या या व्हिडिओवर तिचे काही चाहते अरबाज आणि तिला पुन्हा एकत्र येण्याचा संदेश देत आहेत. तर काही हा सर्व प्रकार मुर्खपणाचा असल्याचे बोलत आहेत. एका युझरने ‘नवऱ्याकडून १५ कोटी रुपये पोटगी घेतली आणि आता त्याचाच वाढदिवस साजरा करतेय’, असा मेसेज टाकला.

या फोटो आणि व्हिडिओमुळे मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अरबाज आणि मलायका भलेही वेगळे झाले असतील पण तरीही आजही ते एकत्र राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघं अनेकदा एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात.

सध्या मलायकाला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर येणाऱ्या अत्यंत वाईट कमेंट्सना सामोरं जावं लागत आहे. नुकताच मलायकाचा तोकड्या कपड्यातला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोला अनेक वाईट कमेंटही येत होत्या. फील गुड फॅब्रिक नावाच्या इन्स्टाग्राम युझरने मलायकाच्या एका फोटोवर कमेंट करताना लिहिले की, ‘आजकालच्या स्त्रीया अशाच करतात. श्रीमंत मुलांना जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करतात. मग घटस्फोट घेऊन त्यांच्याकडून पोटगी घेतात. त्यांनी दिलेल्या पोटगीवर नंतरच आयुष्य आरामात घालवतात.’ तू स्वतः कमवत असून तुला पोटगीची गरज काय? असा प्रश्नही त्याने मलायकाला विचारला.