अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरून मिलिंद फिटनेस संदर्भातील अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांना वेगवेगळ्या टीप्स देत असतो. तसचं चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असतो. मिलिंद सोमणने नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या धुम्रपानाच्या सवयी बद्दल आणि त्यावंर कसं नियंत्रण आणलं यावर खुलेपणाने चर्चा केलीय.

मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने त्याला जडलेल्या धुम्रपानाच्या सवयीबद्दल सांगितलं आहे. धुम्रपान करणं ही आजपर्यंतची सर्वात मूर्ख चूक असल्याचं तो यात म्हणाला आहे. ‘कॅप्टन व्योम’ या साय-फाय मालिकेच्या शूटिंगवेळी मिलिंदला धुम्रपानाचं व्यसन जडलं. यावेळी तो ३२ वर्षांचा होता आणि दिवसातून जवळपास ३० सिगारेट ओढायचा असं त्याने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. धुम्रपानाचं व्यसन अगदी पटकन लागलं असं देखील तो म्हणाला आहे.

धुम्रपानाचं हे व्यसन सोडवणं अत्यंत कठीण असल्याचं मिलिंद त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे. मात्र सुदैवाने काही चांगल्या सवयींच्या जोरावर मिलिंद सोमणने या व्यसनावर ताबा मिळवला आणि त्याने लवकरच सिगारेट पूर्णपणे बंद केली. तो म्हणाला, “मी नशीबवान आहे मला इतर अनेक चांगल्या सवयी आहेत. त्यामुळे यातून मी हळूहळू बाहेर पडू शकलो. सगळेच इतके भाग्यवान नसतात.”

मिलिंद त्याच्या पोस्टमध्ये म्हणालाय, “तंबाखूमुळे निर्माण होणारा आरोग्याचा धोका हा जगातील आरोग्यासंबधीचा सर्वाधिक मोठा धोका आहे. जगभरात दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा तंबाखूच्या व्यसनामुळे बळी जातो अशी जागतिक आरोग्य संस्थेची आकडेवारी सांगते.” हे सांगतानाच त्याने आयुष्यातील मोठया चुकीबद्दल सांगितलंय. “दरवर्षी ३१ मे म्हणजेच वर्ल्ड नो टोबॅको डे हा माझ्यासाठी उत्सव असतो. तसचं हा दिवस मला मी आजवर केलेल्या सर्वात मोठ्या मूर्खपणाची आठवण करून देतो ते म्हणजे धुम्रपान.” असं मिलिंद त्याच्या पोस्टमध्ये म्हणालाय.

आणखी वाचा: प्रिया प्रकाश वारियरचे बोल्ड फोटो व्हायरल, टॉपलेस फोटोची सोशल मीडियावर चर्चा

आणखी वाचा: “करणचे विवाहबाह्य संबध”; गेल्या अनेक वर्षापासून अत्याचार सुरू असल्याचा नीशा रावलचा आरोप

मिलिंद सोमणच्या या पोस्टमुळे अनेक नेटकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून काही नेटकऱ्यांनी त्यांचा धुम्रपानावर नियंत्रण आणण्याचा तसचं धुम्रपान पूर्णपणे कसं बंद केलं याचा अनुभव शेअर केलाय.