दाक्षिणात्य अभिनेता नंदामुरी बालाकृष्ण हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. नंदामुरी यांचे लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नंदामुरी यांनी ए आर रहमानविषयी एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.  एवढंच नव्हेतर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार हा त्यांच्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे, असे म्हणाल्याने ते चर्चेत आले आहेत.

नंदामुरी बालाकृष्ण यांनी नुकतीच एका तेलुगू वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. “ए आर रहमान कोण आहे? हे मला माहित नाही. मला त्याच्याबद्दल काही वाटतं नाही. दशकातून एकदा तो हिट गाणं देतो आणि ऑस्कर पुरस्कार मिळवतो,” असे नंदामुरी बालाकृष्ण म्हणाले. दरम्यान, ए आर. रहमाने नंदामुरी बालकृष्णा यांच्या ‘निप्पू राव्वा’ चित्रपटासाठी संगीत दिले होते.

आणखी वाचा : गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन

नंदामुरी बालकृष्ण पुढे म्हणाले, केवळ ऑस्करच नाही तर ते भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मानत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामराव यांच्यासाठी योग्य नव्हता. “सर्व पुरस्कार म्हणजे माझ्या पायाच्या धुळी समान आहेत. तेलुगू चित्रपट सृष्टीत माझ्या कुटुंबाच्या योगदानाची बरोबरी कोणताही पुरस्कार करु शकत नाही. मला वाटतं की भारतरत्न हा पुरस्कार एन. टी. आर यांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे. माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या वडिलांना नाही तर या पुरस्कारांना वाईट वाटले पाहिजे की ते आमच्याकडे नाहीत,” या आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंदामुरी बाळकृष्ण हे पहिल्यांदा चर्चेत आले नाहीत. या आधी चाहत्यांना आणि इतरांना कानशिलात लगावल्यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्यान, नंदामुरी हे ‘अखंड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे बॉयपती श्रीनु यांनी केले आहे.