बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाख्री आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे दोघे आता पुन्हा एकत्र आले असून लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘द क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार पुढील वर्षी हे दोघेजण लग्न करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्न करण्यास उदयने होकार दिला असून आता चोप्रा कुटुंबिय नर्गिसच्या उत्तराची वाट पाहत आहेत. या काळात उदयची भेट घेण्यासाठी ती अनेकदा न्यूयॉर्कहून मुंबईला आल्याचेही कळत आहे. इतकेच नव्हे तर जुहू येथील यश चोप्रा यांच्या बंगल्यात काही दिवस ती राहिली असून उदयची आई पॅमेलासोबतही तिने काही काळ घालवला.

वाचा : संसदीय समिती ‘पद्मावती’चा तिढा सोडवणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नर्गिस आणि उदयने त्यांच्या रिलेशनशिपचा कधीच उघडपणे स्वीकार केला नव्हता. पण, सोशल मीडियावर त्यांच्या सिक्रेट डेटचे आणि व्हेकेशनचे फोटो नेहमीच व्हायरल होत होते. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले होते.