लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. या एक महिन्याच्या कालावधीत ही जोडी चांगलीच चर्चेत राहिली. त्यांच्या लग्नसोहळ्यापासून ते त्यांच्या महागड्या हनीमून रुमपर्यंत प्रत्येक गोष्ट ही चाहत्यांच्या चर्चेचा भाग ठरली. त्यातच आता नेहाने लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यामुळे रोहनप्रीतसोबतचा एक रोमॅण्टीक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नेहा- रोहनप्रीत सध्या दुबईला हनीमूनसाठी गेले असून नुकताच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. म्हणूनच नेहाने एक रोमॅण्टीक व्हिडीओ शेअर करत रोहनप्रीत आणि त्याच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
“आज आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी तुझे आणि तुझ्या कुटुंबीयांचे मनापासून आभार”, असं कॅप्शन नेहाने या व्हिडीओला दिलं आहे. नेहाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रोहनप्रीतनेदेखील त्यावर एक पोस्ट लिहिली आहे.
“तुझ्यामुळे आयुष्य आणखी सुंदर झालं आहे. आपल्या लग्नाला एक महिना झाला आणि तू माझ्यासोबत आहेस यावर माझा विश्वासच बसत नाहीये”, असं रोहनप्रीत म्हणाला.
दरम्यान, एका गाण्याच्या निमित्ताने रोहनप्रीत आणि नेहाची ओळख झाली. पुढे याच ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे २०२० मधील सर्वात गाजलेलं लग्न म्हणून या दोघांच्या विवाहसोहळ्याकडे पाहिलं जातं.