भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अजु वर्गीज यांना केरळ उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ऑनलाइन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणात न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे. विराट, तमन्ना आणि अजु ऑनलाइन रम्मी गेमचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहेत. याप्रकरणात उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

तामिळनाडू सरकारने सट्टेबाजी सुरु असणाऱ्या ऑनलाइन गेम्स आणि अॅप्सवर बंदी आणली आहे. यामध्ये ऑनलाइन रम्मी गेमचा देखील समावेश आहे. एका व्यक्तीने या गेममध्ये पैसे बुडाल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तामिळनाडू सरकारनं बंदी आणण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा- ‘तांडव’ला दिलासा नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक राज्यांमध्ये ऑनलाइन गेम्सद्वारे लोकांची फसवणूक होत आहे. गुगल प्ले स्टोअरमधून देखील असे काही अॅप्स हटवण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये देखील अशा गेम्सवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.