बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी ही अभिनेत्री चर्चेत येण्यामागचे कारण विराट नसून, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी आहे. अनुष्का आणि साक्षीमध्ये असलेल्या कनेक्शनची माहिती फार कमीजणांना असेल. या दोघींमध्ये फार जुने नाते आहे.

वाचा : शौक बहुत बडी चीज है!

अनुष्काच्या फॅन क्लबने नुकतेच ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोंचीच चर्चा पाहायला मिळतेय. अनुष्का आणि साक्षी शाळेत शिकत असतानाचे हे फोटो असल्याचे म्हटले जातेय. या दोघीही आसाम येथील सेंट मेरी स्कूलमध्ये एकत्र शिकत होत्या. तेव्हापासून या दोघींची घट्ट मैत्री आहे. एका फोटोत वेशभूषा केलेली काही लहान मुले दिसतात. त्यामध्ये गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेली सुंदर मुलगी अनुष्का असून परीच्या वेषातील मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर साक्षी आहे.

वाचा : ‘आम्ही सोबत असल्यावर आम्हाला इतर कोणाची गरज नाही’

गेल्याच आठवड्यात झालेल्या इंडियन स्पोर्ट्स अवॉर्ड्सला अनुष्का आणि विराटने एकत्र हजेरी लावली होती. दोघांनी रेड कार्पेटवर एण्ट्री करताच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या. विराट – अनुष्कामध्ये असलेलं प्रेम यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.