मराठी चित्रपटसृष्टीतील सौंदर्यवती प्रार्थना बेहरे आज अभिषेक जावकर याच्यासह विवाहबंधनात अडकणार आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘फुगे’, ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही अभिनेत्री वयाच्या ३४ व्या वर्षी नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

childrens day 2017 PHOTO : ..या प्रसिद्ध मराठी कलाकारांना ओळखलंत का?

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी प्रार्थना ‘अॅरेन्ज मॅरेज’ करत आहे. तिच्या आई-वडिलांच्या संमतीनेच अभिषेकसोबत तिचे लग्न ठरले. मात्र, सोशल मीडियावरील प्रार्थना आणि अभिषेकचे फोटो पाहता त्यांचे अॅरेन्ज मॅरेज असल्याचे तुम्हाला अजिबात वाटणार नाही. हे दोघं जणू एकमेकांना वर्षानुवर्षे ओळखत असल्यासारखेच या सुंदर जोडप्याकडे पाहून वाटते.

वाचा : ‘इंडियन आयडॉल’ होण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो’ आज आहे फराहचा आचारी

प्रार्थना ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणार असल्याचे याआधीच आम्ही तुम्हाला सांगितले होते. गोव्यात १२, १३ आणि १४ असे तीन दिवस हा विवाहसोहळा सुरु आहे. प्रार्थना-अभिषेकचे संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे मित्रमंडळी यासाठी ११ तारखेपासूनच गोव्याला पोहोचले होते. या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, प्रार्थनाचा सर्वात जवळचा मित्र आणि ‘कॉफी आणि बरंच काही’मधील तिचा सहकलाकार वैभव तत्ववादी हासुद्धा आपल्या मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला आहे. वैभवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रार्थनाच्या हळदी समारंभातील फोटो शेअर केला. या फोटोत वैभवसह हळदीने माखलेले प्रार्थना आणि अभिषेक दिसतात. तसेच, त्याआधी मेहंदी समारंभही पार पडला. यावळी प्रार्थनाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता.

https://www.instagram.com/p/BbcRNcAhHXx/