मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. निर्माता, दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत प्रार्थनाने संसार थाटला असून, या नवदाम्पत्याने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

​वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’च्या चित्रीकरणामधील काही भाग लीक

d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

गोव्यात झालेल्या प्रार्थना – अभिषेकच्या डेस्टिनेशन वेडिंगची बरीच चर्चा मनोरंजन विश्वात रंगली. अनेक कलाकार मंडळींनी या लग्नात कल्ला केल्याचे पाहायला मिळाले. प्रार्थनाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार राहिलेल्या कलाकार मंडळींनी या लग्नसोहळ्यातील काही फोटो इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर केले होते. तसेच, स्वतः प्रार्थनानेदेखील नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले. या फोटोंमधील एक फोटो सर्वांचेच विशेष लक्ष वेधत आहे.

वाचा : ‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील

प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक यांनी त्यांच्या बोटावर एकसारखाच टॅटू काढला आहे. हा टॅटू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. दोघांनीही हाताच्या बोटावर लग्नाची तारीख म्हणजेच १४.११.१७ अशी गोंदवून घेतलीय. या फोटोला प्रार्थनाने #marriagedatetattoo #tattooforlife #foreverlove असे हॅशटॅग्सही दिले आहेत. हा आपला ड्रीम टॅटू असल्याचे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

https://www.instagram.com/p/Bbt75kUARgQ/

https://www.instagram.com/p/Bbq8b7Lgfa1/