बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. फोर्ब्सच्या ‘१०० मोस्ट पावरफुल वूमन २०१७’च्या यादीत प्रियांकाला स्थान मिळाले आहे. या यादीत तिला ९७वे स्थान मिळाले असून, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल या अग्रस्थानी आहेत.

TOP 10 NEWS : काजोल-राणीची भेट आणि मनोरंजन विश्वातील इतर घडामोडी, गॉसिप

मनोरंजन क्षेत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘१५ मोस्ट पावरफुल वूमन’च्या यादीतही प्रियांकाने स्थान मिळवले आहे. यामध्ये बेयॉन्स, टेलर स्विफ्ट आणि जेके रॉलिंग यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. प्रियांका ही उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण, याव्यतिरिक्त ती युनिसेफची सदिच्छा दूतही आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवणारी यशस्वी अभिनेत्री म्हणून ती प्रसिद्ध आहे.

PHOTOS : मुलगी आराध्यासह ऐश्वर्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

गेल्याच वर्षी फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दहा टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या यादीत तिने स्थान मिळवले होते. यात ती आठव्या स्थानावर होती. तर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींच्या फोर्ब्स यादीत ती सातव्या स्थानावर होती.
प्रियांका बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जातेच. पण त्याचसोबत गेली काही वर्षे हॉलिवूडमध्ये काम केल्यामुळे ती तेथेही प्रसिद्ध आहे. ‘क्वांटिको’ या टीव्ही सीरिजमुळे तिला खरी प्रसिद्ध मिळाली. सध्या ती याच मालिकेच्या तिसऱ्या सिजनच्या चित्रीकरणासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. याव्यतिरिक्त ‘अ किड लाइक जेक’ आणि ‘इसन्ट इट रोमॅण्टिक?’ हे दोन हॉलिवूडपटही तिच्या हातात आहेत.