अभिनेत्री मीरा चोप्रा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. परंतु जेव्हा कधी ती सोशल मीडियावर येते तेव्हा ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. यावेळी देखील तिने एक आश्चर्यचकित करणारे ट्विट केले आहे. तिच्या वडिलांना चाकू दाखवून चक्क पोलीस कॉलनीमध्येच लुटण्यात आलं.

सर्वाधिक वाचकपसंती – “लॉकडाउनमुळे कामाचे पैसे मागायला देखील लाज वाटतेय”; अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचकपसंती – ‘हसमुख’वर बंदी नाहीच; दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

नेमकं काय घडलं?

मीरा ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहिण आहे. ती आपल्या कुटुंबासोबत दिल्लीमध्ये राहते. मीराचे वडिल पोलीस कॉलनीमध्ये फेरफटका मारत होते. त्याचवेळी बाईकवरुन आलेल्या दोन गुंडांनी त्यांना अडवलं. त्यांना चाकूचा धाक दाखवला. व त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. मीराने ट्विटरव्दारे ही संपूर्ण घटना सांगितली आहे. तसेच या गुंडांना लवकरात लवकर पकडण्याची विनंती तिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केली आहे.

यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्या ट्विटची दखल घेत या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांनी मीराला FIR कॉपीचा नंबर पाठवण्यास सांगितला. या ट्विटरवर तिने देखील त्वरीत उत्तर देत FIRनंबर ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना दिला. मीराने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.