सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर जिंदा है’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगदेखील मोठ्या प्रमाणावर झाली होती. चित्रपटाच्या तिकीटासाठी सलमानचे चाहते धडपडत असतानाच मुंबईतील जुहू इथल्या पीव्हीआरमध्ये प्रेक्षकांची निराशा झाली. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार ऐन वेळी ‘टायगर जिंदा है’ ऐवजी ‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला.

मध्यांतरापर्यंत ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट दाखवल्यानंतर अचानक मध्यांतरानंतर पुलकित सम्राट आणि रिचा चड्ढाचा ‘फुकरे रिटर्न्स’ लावण्यात आला. जेव्हा ही गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर ही चूक सुधारण्यात आली. मात्र तोपर्यंत प्रेक्षकांची प्रचंड नाराजी झाली होती.

वाचा : ‘साहो’मधील श्रद्धाच्या भुमिकेबद्दल प्रभास म्हणतो…

या घटनेची कबुली देत पीव्हीआरचे रवी सिब्बल संपूर्ण प्रकरणावर म्हणाले की, ‘हो, अशाप्रकारची घटना घडली आहे. हे अत्यंत दुर्दैवी होते. मात्र काही मिनिटांतच आम्ही परिस्थिती सांभाळली.’

The PadMan Song: भारताचा नवा चेहरा दाखवणारा ‘मॅडमॅन पॅडमॅन’

दरम्यान, २२ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘टायगर जिंदा है’ने केवळ तीन दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ११४.९३ कोटींची कमाई केली आहे.