कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखीही बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून विशेष ओळखली जाते. पण आता राखीने रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना मदत केली असून चांगला संदेश दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर राखीचे कौतुक होत आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने राखी सावंतचा रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलांना मदत करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलांना फळे खाऊ घालताना दिसत आहे. दरम्यान तिने भीक मागू नका, काम करा आणि शिक्षण घ्या असे म्हटले असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब’, राम गोपाल वर्मांने व्यक्त केली नाराजी
व्हिडीओमध्ये राखी बोलताना दिसत आहे की मुलांनो शाळेत जा, काम करा पण भीक मागू नका. भीक मागणे ही चांगली गोष्ट नसते. हे चुकीचे काम आहे. त्यानंतर ती मुले राखीला म्हणतात घरी छोटे भाऊ बहिण आहेत त्यांचे पोट भरण्यासाठी आम्हाला भीक मागावी लागते.
ते ऐकून पुढे राखी म्हणते, तुमच्या आईला सांग कमी मुलं जन्माला घाल. सध्या सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. राखीने त्या लहान मुलांना ज्या प्रकारे समजवले ते पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
काही दिवसांपूर्वी राखी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. ती टॉप ५ स्पर्धकांमध्येही पोहोचली होती. पण राखीने पैसे घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राखीने शोमध्ये प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले होते.