बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नेहमीच विविध कारणांसाठी बी-टाऊनमध्ये चर्चेत असते. दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच पाहायला मिळते. रुपेरी पडद्यावरच्या त्यांच्या प्रेमाची जेवढी चर्चा रंगली तेवढीच किंबहूना त्याहून जास्त चर्चा ही त्यांच्या पडद्यामागच्या प्रेमाचीही रंगली. या प्रेमीयुगुलाने आतापर्यंत कधीच त्यांच्यातील नात्याचा खुलासा केलेला नाही. मात्र, ज्या पद्धतीने ते एकमेकांसोबत पार्टी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसतात ते पाहता या दोघांमध्ये नक्कीच प्रेमप्रकरण चालू असल्याचे दिसून येते. २०१५ मध्ये रणवीरचा मित्र करण कपाडियाच्या लग्नामध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं. त्याच लग्नामधील काही दृष्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

करण कपाडिया हा अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा चुलत भाऊ आणि रणवीर सिंगचा जवळचा मित्र आहे. २०१५ मध्ये करण कपाडिया दिग्दर्शक नित्या मेहरासोबत विवाहबद्ध झाला. या लग्नसमारंभाला रणवीर आपली कथित प्रेयसी दीपिकासोबत उपस्थित होता. त्यावेळीसुद्धा दोघांच्या एकत्र उपस्थितीमुळे त्यांच्या नातेसंबंधाबद्दल बी-टाऊनमध्ये खूप चर्चा झाली होती. त्या लग्नामधील दोघांचे एकत्र फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांना पाहायला मिळाले नव्हते. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसमारंभातील दोघांचे नाचतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. दोघांचा वरातीतील अफलातून डान्ससुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/BVuvln-hp_7/

https://www.instagram.com/p/BVuvLPIBjMO/

https://www.instagram.com/p/BVua1BJhC8U/

वाचा : राजामौलींच्या ‘त्या’ वक्तव्याने मी दुखावलेय- श्रीदेवी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटो आणि व्हिडिओमध्ये रणवीरचा ‘बाजीराव’ लूक स्पष्ट दिसून येतोय. त्यावेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’चे चित्रीकरण सुरू होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये आता प्रेमसंबंध राहिले नसल्याचे म्हटले जात होते. बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटी जोड्यांप्रमाणेच या जोडीतही दुरावा आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. लवकरच हे दोघही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर याचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे.