निर्दयी आणि डोळ्यातून आग ओकणाऱ्या अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’च्या ट्रेलरमधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. काल दुपारी चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित होताच रणवीरवर कौतुकाचा वर्षाव झाला. केवळ चाहत्यांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनीही रणवीरच्या कामाची प्रशंसा केली. आपल्याला मिळालेल्या या अद्भूत प्रतिसादाबद्दल आणि प्रेमासाठी रणवीरने सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. १ डिसेंबरला सर्वांना भव्य असा सिनेमॅटिक अनुभव मिळण्याची ग्वाही देत बॉलिवूडच्या या अतरंगी अभिनेत्याने चाहते, मित्रपरिवार आणि इंडस्ट्रीतील आपल्या सहकाऱ्यांचे भावूक पोस्ट शेअर करत आभार मानले.

वाचा : ‘पद्मावती’च्या ट्रेलरने सलमानच्या चिंतेत वाढ

त्याने लिहिलंय की, वरिष्ठ सहकारी, मित्र, मीडिया, व्यापार समीक्षक आणि सर्वात महत्त्वाचे आमचे प्रेक्षक या सर्वांचे ‘पद्मावती’च्या ट्रेलरवर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी मी मनापासून आभार मानतो. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कौतुकाचा साक्षीदार होण्याचा अनुभव अभूतपूर्व आहे. हे खूपच दुर्मिळ आहे.

वाचा : सनी देओलचा मुलगा पहिल्याच चित्रपटाचं शूटिंग अर्धवट सोडून परतला

आपल्या या पोस्टमध्ये रणवीरने भव्य चित्रपटांचा बादशहा असलेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही प्रशंसा केली. त्याने लिहिलंय की, ”पद्मावती’साठी संपूर्ण टीमने गाळलेल्या घामाचे आणि अथक परिश्रमाचे हे फळ आहे. विलक्षण आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या संजय सरांनी या चित्रपटासाठी लढा दिला. यासाठी त्यांनी बरंच काही सहन केले असून अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यांच्यातील कसदारपणा आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळेच या ट्रेलरला यश मिळालेय. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ते मला प्रशिक्षण देत असून मी रोज त्यांच्याकडून नवे काहीतरी शिकून स्वतःला घडवतोय.’

आपल्या सौंदर्याने आणि राजेशाही लूकने सर्वांना घायाळ करणाऱ्या दीपिका पदुकोणनेही सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रशंसेसाठी आभार मानले आहेत.

https://twitter.com/deepikapadukone/status/917436904840335368

Story img Loader