अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी मध्यंतरी रिया आणि पर्यटनमंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे एकमेकांना ओळखत असल्याची चर्चा होती. परंतु, याविषयी रियाने मौन सोडलं असून मी आदित्य ठाकरेंना कधीच भेटले नाही असं रियाने म्हटल्याचं एनटीडीव्हीच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“आदित्य ठाकरेंना मी कधीच भेटले नाही आणि कधी त्यांच्याशी माझं बोलणंदेखील झालं नाही. त्यामुळे मी त्यांना ओळखत नाही.  फक्त ते एक राजकीय व्यक्ती आहे. एक नेता आहेत इतकंच मला माहित आहे”, असं रिया म्हणाली.

आणखी वाचा- मलाही आत्महत्या करावीशी वाटते, मग त्याला जबाबदार कोण असेल ?- रिया चक्रवर्ती

पुढे ती म्हणते, “मला अटक करावी असं कोणतंच काम मी केलेलं नाही. त्यामुळे मला अटक करण्यात येईल असं वाटत नाही. ज्या शारीरिक आणि मानसिक त्रासातून मी आणि माझं कुटुंब सध्या जात आहोत, ते खरंच सहनशीलतेच्या पलिकडचं आहे. मी आता खचले आहे. पण तरी सुध्दा मी रोज माझा आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करते. आम्ही जीवंत आहोत कारण मी खरं बोलतीये. तसंच मी कोणत्याच ड्रग डिलरची भेट घेतलेली नाही आणि कधी ड्रग्सचं सेवनही केलेलं नाही. त्यामुळे मी रक्त तपासणीसाठी तयार आहे”.

आणखी वाचा- लायकी काढणाऱ्या बिहारच्या पोलीस महासंचालकांना रिया चक्रवर्तीने दिलं उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असून रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.