‘सैराट’ सिनेमातील लंगड्या आठवतोय का? त्याला कोण कसं विसरेल म्हणा.. लंगड्या ही व्यक्तिरेखा साकारलेला तानाजी गलगुंडे आता लवकरच हिंदी शोमध्ये झळकणार आहे. कृष्णा अभिषेक आणि सुदेश लेहरी यांच्यासोबत ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये त्याला पाहता येणार आहे. या शोचे तो मुख्य आकर्षण असल्याचे म्हटले जात आहे.

कृष्णा अभिषेकला मिळाली मिथुन चक्रवर्तींची साथ

तानाजीसोबत ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम रिधीमा पंडितही या शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये एक ग्लॅमर तडका म्हणून रिधीमा दिसेल यात काही शंका नाही. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना आणि रोशेल राव यांच्या ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा आहेत तशाच पद्धतीने रिधीमालाही दाखवले जाईल असे सध्या तरी वाटते. या शोची धाटणी काहीशी ‘द कपिल शर्मा शो’सारखीच आहे. इथे नवज्योत सिंग सिद्धूऐवजी अभिनेते मिथुन चक्रवर्ती दिसणार आहेत.

गेल्या वर्षी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘सैराट’ची संपूर्ण टीम आली होती. यावेळी सोनीने तानाजीला या नवीन शोसाठी विचारले. तानाजीला विनोदाची चांगलीच जाण आहे. त्यामुळेच त्याची या टिव्ही शोसाठी निवड करण्यात आली असे म्हटले जात आहे. कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी, सुगंधा मिश्रा आणि अली असगर यांच्यासोबत रिधीमा आणि तानाजी पहिल्यांदाच काम करत आहेत. ‘बहु हमारी… ‘मध्ये रिधीमाने रोबोटची विनोदी व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेमुळेच तिची या शोमध्ये वर्णी लागली.

रिधीमा आणि तानाजीशिवाय इतरही अनेक कलाकार या शोमध्ये दिसणार आहेत. खऱ्या आयुष्यातील पती- पत्नी जोडी मनोज आणि सीमा पाहवा पहिल्यांदा या शोमधून एकत्र येणार आहेत. हम लोग या गाजलेल्या मालिकेत सीमा यांनी बडकी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर मनोज पाहवा यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका केल्या आहेत. या नावाजलेल्या चेहऱ्यांमध्ये अरू वर्मा हा नवोदित कलाकार दिसणार आहेस. तो याआधी ‘बेफिक्रे’ आणि ‘२ स्टेट्स’ या सिनेमात दिसला होता. ‘द ड्रामा कंपनी’मधून अरू आता टिव्ही जगतातही पदार्पण करत आहे.

….आणि चार्ली चॅप्लिन व्यासपीठावर रडले

‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या विनोदी मालिकांमधून कलाकार घेऊन ‘द ड्रामा कंपनी’ची टीम उभारण्यात आली आहे. येत्या जुलैमध्ये हा शो प्रदर्शित केला जाईल.

Story img Loader