अभिनेता सलमान खानच्या लहरी स्वभावाचे अनेक किस्से बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. एरवी सर्वांशी हसत-खेळत वागणाऱ्या सलमानला एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की, त्याचा पारा क्षणात चढतो. नुकताच त्याच्या या स्वभावाचा प्रत्यय आला.

फिल्मफेअर या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान सलमान आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अचानकपणे एक चाहता त्याच्याजवळ आला आणि त्याला आपल्या मोबाइलची खासियत सांगू लागला. त्या चाहत्याकडे असलेला मोबाइल तुटत नाही असं, तो सलमानला सतत सांगत होता. सुरूवातीला सलमानने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पण तरीही तो चाहता त्याच्या मोबाइल फोनचे गोडवे गातच राहिला. हा फोन कितीही जोरात आपटला तरी फुटत नाही असे तो सलमानला वारंवार सांगत होता.

सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार सिनेमे

अखेर त्याच्या सततच्या बडबडीमुळे सलमान खान प्रचंड वैतागला आणि त्याने चाहत्याचा फोन घेऊन तो जोरात जमिनीवर आपटला. मात्र, हा फोन दणकट असल्यामुळे तुटला नाही. त्यामुळे सलमानने तो मोबाइल पुन्हा एकदा आपटला. तरीही मोबाइलला काहीच झाले नाही. एव्हाना हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला. तेव्हा त्यांनीही सलमान खानला मोबाइल आणखी जोरात आपटण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरूवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर सलमानने दोन-तीन वेळा आपटल्यानंतर हा मोबाइल तुटला. त्यानंतर हा तुटलेला मोबाइल हातात घेऊन सलमान त्याला आव्हान देणाऱ्या चाहत्याजवळ गेला आणि ,’फोन तुटणार नाही असं म्हणाला होतास ना?’, असे कुत्सितपणे विचारले. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, सलमानला आव्हान देणाऱ्या त्या चाहत्याच्या तोंडावर बारा वाजल्याचे भाव दिसत होते.