क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच लग्नबंधनात अडकले. हे नवदाम्पत्य सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तेथील काही फोटोही या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पण त्यातल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधलंय. सागरिका आणि झहीरची मैत्रीण आणि टेनिस स्टार सानियाने एका फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिली असून ते वाचून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाही आहे.

इन्स्टाग्रामवर सागरिकाने झहीरचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये झहीर सागर किनाऱ्यावर निवांत पहुडलेला पाहायला मिळतोय. यावर सानियाने कमेंट दिली की, ‘झहीर कदाचित एकटाच हनीमून साजरा करतोय.’ त्यानंतर सानियाच्या विनोदबुद्धीवर आणि निरीक्षणावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रभासला घातली भुरळ

२३ नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर झहीर- सागरिकाने आपल्या मित्रपरिवारासाठी मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टी आणि आलिशान रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.