बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्यामागचा न्यायालयीन ससेमिरा काही संपायला तयार नाही. संजूबाबा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात समन्स जारी केले आहे. या समन्सनुसार त्याला १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

वाचा : डुलक्या घेत गाडी चालवणाऱ्या चालकाला आमिरने थांबवलं

हे संपूर्ण प्रकरण २००९ मधील आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. त्यावेळी एका जाहीर सभेत संजूबाबाने बसपा अध्यक्ष मायावती यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. १९ एप्रिल २००९ रोजी टिळकनगर क्षेत्रात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना भाषणात संजूबाबाने हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ‘मी मायावतींना जादूची झप्पी देईन’, असे तो म्हणाला होता. जिल्हा प्रशासनाने या सभेचे व्हिडिओ शुटिंग केले होते. त्यानंतर संजय दत्तविरोधात कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा : ‘मासिक पाळीतही त्याने माझ्यावर शारीरिक अत्याचार केला’