अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता ‘प्रस्थानम’ या चित्रपटाची चर्चा आहे. कारण यामध्ये संजय दत्त मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकताच त्याचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

‘हक दोगे तो रामायण शुरू होगी, छीनोगे तो महाभारत,’ हा संजय दत्तच्या आवाजातील दमदार संवाद या मोशन पोस्टरमध्ये ऐकायला मिळत आहे. ‘प्रस्थानम’ हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असून यामध्ये संजय दत्त आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अली फजल आणि अमायरा दस्तुरदेखील या चित्रपटात झळकणार आहेत. १ जून रोजी नर्गिस दत्त यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त लखनऊमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

वाचा : अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान

थ्रिलर फॅमिली ड्रामा या प्रकारात मोडणाऱ्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या निमित्ताने संजूबाबा आणि मनिषाची जोडी तब्बल दहा वर्षांनी एकत्र पाहता येणार आहे. याआधी १९९२ मध्ये ‘यल्गार’ चित्रपटातून त्यांनी एकत्र काम केलं होतं. ज्यानंतर दोघांच्याही बॉलिवूड कारकिर्दीला कलाटणी मिळाली होती.