लोकप्रिय कॉमेडियन आणि डॉक्टर संकेत भोसलने ‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री सुगंधा मिश्राशी लग्न केले. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. पण आता त्यांच्या साखपुड्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संकेलतला रडू कोसळल्याचे दिसत आहे.
सुगंधा आणि संकेतने सोशल मीडियावर मेहंदी, हळद आणि लग्न समारंभातील काही फोटो शेअर केले होते. त्यांचे फोटो चर्चेत होते. आता सुगंधाने संकेतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भावूक होऊन रडत असल्याचे दिसत आहे.
Video: स्वीटूच्या हातची पुरण पोळी की आईने बनवलेला पराठा? काय निवडणार शाल्व जाणून घ्या
View this post on Instagram
‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केले लग्न, पाहा फोटो
व्हिडीओमध्ये संकेत पत्नी सुंगधाविषयी बोलताना दिसत आहे. ‘सुंगधाविषयी मी सुरुवाती पासून बोलत आलो आहे की तू खरतनाक आहेस. म्हणजे सर्वच मुलींना खतरनाक असायला हवे. पण जर एखादी मुलगी सुगंधा इतकी खतरनाक असेल तर तुम्ही प्रेमात पडाल. आज मला खूप आनंद झाला आहे. मला कळत नाही की मी…’ असे संकेत बोलताना दिसत आहे. बोलता बोलता त्याला रडू कोसळते. सुगंधा त्याचे डोळे पुसत त्याला शांत केले आहे. संकेत भावूक झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
गेल्या दोन- तीन वर्षांपासून संकेत आणि सुगंधा एकमेकांना डेट करत होते. अखेर २६ एप्रिल रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जालंधर येथे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लग्न केले.