ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी ‘नेक्स्ट ऑफ किन’ या टीव्ही सीरिजमध्ये भूमिका साकारत आहेत. या सीरिजमध्ये हॉलिवूड अभिनेता जॅक डॅवनपोर्ट त्यांच्या जावयाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शूटिंगदरम्यान या शबाना आझमी आणि जॅकमध्ये चांगलीच मैत्री जमली. सेटवर फावल्या वेळेत आझमींनी त्याला चक्क बॉलिवूड गाण्यावर डान्स करण्यास शिकवले आहे. जॅकला आपल्या तालावर नाचवताना व्हि़डिओ त्यांनी ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पाहा हा व्हिडिओ..
Doing a Bollywood number with Jack Davenport who plays my son in law in ITVs drama series Next Of Kin pic.twitter.com/bcw3h0qPLX
— Azmi Shabana (@AzmiShabana) January 7, 2018
वाचा : …म्हणून करण मागणार आलियाची माफी
”नेक्स्ट ऑफ किन’मध्ये माझ्या जावयाची भूमिका साकारणाऱ्या जॅक डॅवनपोर्टसोबत बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना..’असे कॅप्शन आझमींनी ट्विटरवरील या व्हिडिओला दिले आहे. त्यावर आझमींचा मुलगा आणि अभिनेता फरहान अख्तरनेही ट्विट केले. ‘जेव्हा मी परवरिश हा चित्रपट पाहिला तेव्हाच मला तुमच्यातील या प्रतिभेला फारसा वाव देण्यात आला नसल्याचं प्रकर्षाने जाणवलं. अखेर या सीरिजच्या निमित्ताने डान्स करण्याची संधी मिळाली,’ असं ट्विट त्याने केलं. आझमींचा हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत असून त्याला भरभरून लाइक्स मिळत आहेत.