बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ३ नोव्हेंबर रोजी ५४वा वाढदिवस होता. जगभरातून त्याच्यावर चाहत्यांपासून ते बढ्या बढ्या लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सोशल मीडियापासून ते अनेक वृत्तवाहिन्यांवर शाहरुखचीच चर्चा होती. शाहरुखचा वाढदिवस दुबईमध्ये देखील मोठ्या थाटामाटात साजरा केल्या असल्याचे दिसले. दुबईमधील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर विशेष रोशनाई करत बॉलिवूडच्या या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.

शाहरुखने ‘लव्ह यू दुबई’ असे म्हणत एक आभार मानणारे ट्विट केले आहे. या आगळ्या वेगळ्या शुभेच्छांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासातच तब्बल तीन लाख ५६ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान बुर्ज खलिफावर झळकणारा शाहरुख खान हा पहिला भारतीय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर तुफान पसरल्या होत्या. शाहरुखच्या चाहत्यांनी ‘बुर्ज खलिफावर झळकणारा पहिला वहिला व्यक्ती’ असे म्हणत ट्विट केले होते.

आणखी वाचा : शरद पवारांना आरे तुरे काय करता? जितेंद्र जोशी संतापला

दुबईमधील सर्वात उंच इमारत बुर्ज खिलाफावर गेल्याच महिन्यात २ ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या १५०व्या जयंती निमित्त त्यांचे फोटो आणि ‘वैष्णव जन तो’ हे भजन वाजवण्यात आले होते. त्यामुळे बुर्ज खलिफावर झळकणारा शाहरुख हा पहिला भारतीय नसल्याचे समोर आले आहे.