अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राजला अटक करण्यात आल्यानंतर अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत आली आहेत. यापैकीच एक म्हणजे शर्लिन चोप्रा. आता शर्लिनने राज कुंद्रा विषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

शर्लिनला मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. २०१९ च्या सुरुवातीच्या काळात राज कुंद्राने शर्लिनत्या बिझनेस मॅनेजरशी संपर्क साधला होता. २७ मार्च रोजी यानिमित्ताने मीटिंग झाल्यानंतर, एका टेक्स्ट मेसेज वरून झालेल्या वादावरून राज अचानक शर्लिनच्या घरी आला होता, असे शर्लिनने त्या जबाबात म्हटले आहे.

पुढे शर्लिन म्हणाली, शर्लिनने नकार दिला तरी राज तिला सारखा किस करत होतात. शर्लिनने राजला सांगितले की तिला कोणत्याही विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवायचे नव्हते. तर राजने यावर तिला उत्तर दिले की त्याची पत्नी शिल्पा शेट्टी आणि त्याचं नातं हे काही ठीक नाही आणि यावरून तो घरी बऱ्याच वेळा तणावात असायचा.

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

पुढे शर्लिन म्हणाली की तिला भीती वाटू लागली होती म्हणून तिने राजला थांबवण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने शर्लिनने राजला धक्का दिला आणि ती पटकन बाथरूममध्ये गेली.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर त्यांनी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीची ही चौकशी केली होती. त्या चौकशी दरम्यान शिल्पा राजवर संतापली आणि रडत म्हणाली, ‘तू आपल्या कुटुंबाच नाव खराब केलं.’ आता या सगळ्यात शिल्पा देखील असू शकते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Story img Loader