सगळीकडेच सध्या आनंदी वातावरण आहे. कंदील, पणत्या अंगणात दिसायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमात आणि मालिकेमध्ये देखील दिवाळीची तयारी जोरात सुरु झालेली आहे. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या मंचावर लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या लाडका अभिनेता श्रेयस तळपदेने नुकतीच हजेरी लावली. श्रेयसने आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. पण, या कार्यक्रमामध्ये आलेल्यावर कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी श्रेयसचे मन जिंकले. या विनोदवीरांच्या स्कीट्सने श्रेयसला पोट धरून हसण्यास भाग पाडले. मंचावर श्रेयसने बरीच धम्माल मस्ती केली.

वाचा : TOP 10 NEWS सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात आलेल्या दुराव्यापासून शेराने कतरिनाला दिलेली साथ..

Kolhapur, Parshuram Jayanti, Parshuram Jayanti Celebrated in Kolhapur, Shri Parshuram Palkhi Procession, Kolhapur news, parshuram Jayanti news, marathi news,
सूर्यास्ताच्या साक्षीने कोल्हापुरात परशुराम जयंती; पालखी मिरवणूक उत्साहात
sandal paste on mahadev s pind in dhaneshwar temple
चिंचवडमध्ये प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप; अशी आहे आख्यायिका!
What Nana Patole Said?
नाना पटोलेचं वक्तव्य चर्चेत, “इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार, कारण..”
Mumbai gold smuggling marathi news
मुंबई: सोन्याच्या तस्करीप्रकरणी वर्षभरानंतर आरोपीला अटक
Konkankanya, Janshatabdi,
जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन

कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या मंचावर या दिवाळी विशेष आठवड्यामध्ये श्रेयस तळपदे बरोबरच अशोक हांडे, शरद उपाध्ये आणि सुप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एकूणच या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे हे नक्की. लक्ष्मीपूजनच्या दिवशी अभिनेता श्रेयस तळपदेने मंचावर हजेरी लावली. या मंचावर त्याला एक नाही तर दोन सरप्राईझ मिळाले. एक म्हणजे श्रेयसची पत्नी दीप्तीला देखील कार्यक्रमामध्ये बोलावण्यात आले. या दोघांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच कलर्स मराठी आणि कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या टीमच्या वतीने त्यांना त्यांच्या फोटोचे स्केच भेट म्हणून देण्यात आले जे त्यांना खूप आवडले. श्रेयसला किशोर चौघुले यांच्या पक्या भाईंचे स्कीट खूप आवडले तसेच संदीप गायकवाड यांनी अजय देवगण, अक्षय कुमार आणि नसिरुद्दीन शहा यांची केलेली मिमिक्री विशेष आवडली आणि मी अजय देवगनला या स्कीटबद्दल नक्कीच सांगेन, असा शब्दही त्याने दिला.

वाचा : श्रीदेवी पुन्हा एकदा ट्रोल, कपड्यांची केली चादरीशी तुलना

या मंचावर समीर चौघुले यांनी त्यांची श्रेयस बरोबर असलेली एक विशेष आठवण देखील शेअर केली. समीर आणि श्रेयस कॉलेजमध्ये असताना, एका प्रतीयोगीतेमध्ये श्रेयसला द्वितीय तर समीरला सर्वोत्कृष्ट अभिनेता असे पुरस्कार मिळाले होते ज्याचं वृत्तपत्रामध्ये आलेलं कात्रण अजूनही समीर चौघुलेकडे आहे आणि ते कात्रण तो आपल्या मुलाला नेहेमी दाखवतो. हे ऐकून श्रेयसला कॉलेजचे दिवस आठवले आणि त्याने समीरला सांगितले माझ्यासाठी तू तेव्हाही उत्तम अभिनेता होतास आणि अजूनही आहेस, हे ऐकून समीर भारावून गेला. असे अनेक किस्से, आठवणी आणि मज्जा तुम्हाला कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या दिवाळी विशेष आठवड्यात पाहता येणार आहेत.