बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन तिच्या चित्रपटांपेक्षा प्रेमसंबंधांमुळेच अधिक चर्चेत आली. श्रुती आणि तिचा लंडनस्थित तथाकथित प्रियकर अभिनेता मायकल कोर्सेल यांचे अनेक फोटो आजवर सोशल मीडियावर पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर मायकलने श्रुतीचे वडील आणि अभिनेते कमल हसन यांची भेट घेतल्याचे वृत्तही आले होते. पण, यावेळी मायकल, श्रुती आणि तिची आई सारिका हे एकत्र पाहायला मिळाले. मुंबईतील एका ठिकाणी हे तिघं एकत्र दिसले आणि त्यांचे फोटो वाऱ्यासारखे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

वाचा : ..अन् माझे बाबा कोट्यधीश झाले – पुल्कित सम्राट

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार

या फोटोंमुळे श्रुती आणि मायकलच्या नात्याला आता सारिका यांचीही पसंती मिळाली असल्याच्या चर्चा माध्यमं आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरु आहेत. अनेकदा श्रुती आणि मायकल एकत्र दिसल्यामुळे तसेच, सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

एकदा माध्यमांनी याविषयी श्रुतीला विचारले असता तिने अखेर याबद्दल आपले मौन सोडले. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्य मुलाखतीत ती म्हणाली की, अशा तर्कवितर्कांचा मला फरक पडत नाही आणि त्यावर उत्तर देणेही मला गरजेचे वाटत नाही. माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे मला आवडत नाही त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे मी पसंत करते.

PHOTO : .. असा पार पडला ‘होणार सून..’ फेम रोहनचा लग्नसोहळा

काही महिन्यांपूर्वी मायकल श्रुतीला भेटण्याकरिता मुंबईला आला होता. तेव्हाही त्यांच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले होते. ‘कान चित्रपट महोत्सव २०१७’च्या रेड कार्पेटवरही हे प्रेमीयुगुल एकत्र दिसले होते.