आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यात नक्की काय घडतंय हे जाणून घेण्याची अनेक चाहत्यांची इच्छा असते. याच कारणामुळे गेले अनेक दिवस सोनम कपूरचे चाहते तिच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. सोनम आणि आनंद यांचा विवाहसोहळा ग्रँड स्वरुपाचा असेल यात कोणतीच शंका नाही. मात्र या लग्नाचे एक एक अपडेट मिळत असतांनाच लग्नाच्या अगदी तीन दिवसांपूर्वी एक आणखी नवा अपडेट हाती लागला आहे.

सोनम- आनंदच्या लग्नसोहळ्याची तयारी गेले अनेक दिवस सुरु आहे. मात्र येत्या एक-दोन दिवसात ख-या अर्थाने लग्नाचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार हिरीरिने सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. याचाच पुरावा म्हणजे संगीत सोहळ्यात भाग घेणा-या कलाकारांच्या डान्स प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ. हा व्हिडिओ पाहता सोनमचा संगीत सोहळा चांगलाच रंगणार असल्याचं दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या संगीत सोहळ्यात सेलिब्रिटींचीच गर्दी होणार असल्याची चिन्हं आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोनमचा भाऊ अर्जुन कपूर, अभिनेता वरुण धवन दिसून येत आहेत. तर श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही देखील या संगीत सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं कळत आहे. लग्नामध्ये आनंदच्या कुटुंबियांचे थोडक्यात सोनमच्या व-हाड्यांचं विशेष पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी स्वागतासाठी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील ‘स्वॅग से करेंगे सब का स्वागत’ या गाण्यावर सोनमचे कुटुंबिय ठेका धरणार आहेत. याच गाण्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आला. या व्हिडिओमध्ये सध्या सोनमचे काका संजय कपूर त्यांची पत्नी महीप कपूर, जॅकलिन फर्नांडिस, अनुपम खएर, सतीश कैशिक, मसाबा मंटेना, अंशुला कपूर हे दिसून येत आहेत. ८ तारखेला होणा-या लग्नापूर्वी सोनमचा संगीत सोहळा पंचतारांकित हॉटेल लिला येथे संपन्न होणार आहे.

 

वाचा : जे झालं ते टाळता आलं असतं- शत्रुघ्न सिन्हा